Breaking News

पारनेर तालुक्यात आज 30 अहवाल पॉझिटिव्ह, निघोज येथे एकाच दिवशी 18 व्यक्तींना कोरोना ची लागण !

पारनेर तालुक्यात आज 30 अहवाल पॉझिटिव्ह, निघोज येथे  एकाच दिवशी 18 व्यक्तींना कोरोना ची लागण !
-----------------
कोरोना बाबत तालुक्यातील नागरिक अद्यापही सतर्क नाही ही चिंतेची बाब !


पारनेर प्रतिनिधी-
      पारनेर तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार 30 व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना चा संसर्ग वाढत आहे आजपर्यंत एकूण 1078 व्यक्तींना कोरोना ची लागण झाली तर 28 व्यक्तीचा मृत्यू झाला हि तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे.
पारनेर तालुक्यामध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये निघोज येथील अठरा व्यक्तींना कोरोना ची लागण झाली आहे यामध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींचा समावेश जास्त प्रमाणात आहे तर निघोज येथील अनेक दिवसापासून तालुक्यातील नागरिकांना कोरोना बाबत अचूक माहिती पुरवणाऱ्या पत्रकाराला कोरोना झाला आहे.
     आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव रुग्णांच्या अहवालामध्ये निघोज 18 लोणी हवेली 1 सुपा 1 डिसकळ 1 राळेगण थेरपाळ 2 कर्जुले हर्या 1 गोरेगाव 1 जवळा 2 बाभूळवाडा 1 चोभूत 1 कुरुंद 1 या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी कोरोना चाचणीसाठी किट उपलब्ध नसल्याने शासकीय लॅबच्या अहवालामध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.
तालुक्यांमध्ये संसर्ग वाढत आहे निघोज येथे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे तरीही तेथील नागरिक गांभीर्याने घेत नाही तसेच जवळा सुपा कान्हूर पठार टाकळीढोकेश्वर या तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे
प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही नागरिक गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे संसर्ग वाढत आहे. शासनाने अनेक नियम व अटी शिथिल केल्या आहेत मात्र नागरिकांनी स्वतः कोरोना बाबत नियम व अटी घालून घेतल्या पाहिजेत तरच मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संसर्गाला रोखले जाईल.