Breaking News

खळबळजनक! गणपतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

 Coronavirus Latest: India's Covid-19 Recoveries Rise To 22,455, Deaths At  2,293; Drop In Corona Cases

मुंबई | कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. गणपती दरम्यान हा संपूर्ण परिवार एकत्र आला होता.

कल्याणमध्ये जोशीबाग परिसरील एका चार मजली इमरतीत राहणारा एक मुलगा पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्या मुलाच्या संपर्कात आसलेल्या 40 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. 40 पैकी 30 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

महिनाभरापासून जिल्ह्यात काहीसा आटोक्यात आलेला करोनाचा प्रादुर्भाव गणेशोत्सवानंतर वाढू लागला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे 1 हजार 643 नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 72 वर पोहोचली आहे.