Breaking News

पारनेर तालुक्यात काल 31 अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात काल 31 अहवाल पॉझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे तालुक्यातील  काल प्राप्त  झालेल्या अहवालानुसार 31 व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये सुपा 9 पारनेर 4 रुई छत्रपती 5 हंगे 1 डिसकळ 1 कान्हूर पठार 2 ढवळपुरी 3 म्हसणे 1 वाडेगव्हाण 1 रांजणगाव मशीद 2 कोहकडी 1 वाळवणे 1 या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव अहवालामध्ये समावेश आहे.
सभापती गणेश शेळके यांचा RTPCR अहवाल पोझिटिव्ह आला आहे त्यांच्या कुटुंबातील एकूण 10 सदस्यांची चाचणी केली त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच वाहनचालक व त्याच्या कुटुंबातील 4 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
सभापती गणेश शेळके सध्या स्वतंत्र विलगीकरण  मध्ये आहेत त्यांना कोरोना  कोणतीही लक्षणे नाहीत त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच  आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.