Breaking News

पारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय !

पारनेर तालुक्यात आज 35 अहवाल पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे हा तालुक्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यामध्ये कोरोना चा आलेख वाढत आहे एकूण तालुक्यातील रुग्णांची संख्या 1500 झाली आहे आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील 35 व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.  कोरोना चा समूह संसर्ग वाढला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संख्या वाढताना दिसत आहे.
     आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालात आळकुटी 1 पारनेर 5 भाळवणी 2 टाकळी ढोकेश्वर 1 काळकूप 10 निघोज 1 पाडळी रांजणगाव 1 कारेगाव 2 वडझिरे 1 हिवरे कोरडा 1 वडगाव आमली 1 अपधूप 3 सुपा 3 रांजणगाव मशीद 2 या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
    रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक बेफिकीरीने वाढताना दिसत आहेत प्रशासनाने घालून दिलेले नियमावलीचा नागरिकांकडून फज्जा उडवला जात आहे आज पोलीस निरीक्षक राजेश गवळी  व सुपाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी तालुक्यात विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहे यापुढे ही कारवाई सुरू राहील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.