Breaking News

तब्बल 4 कोटींचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास

 


बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदीत दरोडा टाकुन औषधांचा आणि सिगारेटचा कंटेनर लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोरगाव - निरा रोडवर 4 जून 2020 रोजी आयशर ट्रक नंबर NL 01 L 4339 या ट्रकमध्ये ITC राजंणगाव कंपनीमध्ये तयार झालेली फिल्टर सिगारेट बॉक्स असा 4 कोटी 61 लाख 88 हजार 820 रूपये किंमतीचा माल भरून तो राजणगाव एम.आय.डी.सी. हुन हुबळी कर्नाटक या ठिकाणी घेवून जात असताना राजणगाव एम.आय.डी.सी -न्हावरा पारगाव केडगाव चौफुला -सुपा मार्गे हुबळीकडे जात असताना 13 अनोळखी इसमांनी सिगारेटचा ट्रक दरोडा टाकून लुटला होता.

 सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि गुड, पो.स.ई मोरे व पथक यांचे मदतीने वडगाव निंबाळकर पोलिसांनी सदर गुन्हयातील आरोपी कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (वय 44), ओमप्रकाश कृष्णा झाला (वय 38), दिनेश वासुदेव झाला (वय 50), सुशिल राजेंद्र झाला (37), मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (42), सतिश अंतरसिह झांझा (वय 40), मनोज केसरसिंग गुडेन (वय 40) राहणार सर्व देवास, या आरोपींना अटक करून सदर गुन्ह्यातील 3 कोटी 89 लाख 34 हजार 792 चा मुदेमाल व दोन ट्रक यातील आरोपींकडून जप्त पोलिसांनी जप्त केला.

या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र राज्यात यवत, शिक्रापूर, शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे दाखल होते. परराज्यामध्ये कर्नाटक येथे ब्यादगी, हुबळी, पोलीस स्टेशन हद्दीत, तसंच उत्तरप्रदेश येथे खोराबार, पश्चिम बंगाल, ओरीसा, हरीयाणा राज्यात देखील या आरोपींनी औषधे असणाऱ्या ट्रकवर तसंच सिगारेटचे ट्रकवर दरोडा टाकून ट्रकमधील माल लुटून नेल्याचे गुन्हे दाखल होते.

सदर आरोपींवर मोकांअतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया याच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

   

आरोपींनी केलेल्या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप पाहता. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती विभाग बारामती ,स्था.गु.अ. शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे, पो.स.ई श्रीगणेश कवितके, पो.ना.विठठल कदम, पो.कॉ. भाउसाहेब मारकड, पो.कॉ अमोल भुजबळ यांनी केलेली असून सदर कारवाईबाबत प्रभारी पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते सो यांनी 15 हजार रूपये बक्षीस जाहीर केले आहे. आत्तापर्यंत बारामती उपविभागात 16 टोळ्याविरूद्ध मोकांअर्तगत कारवाई करण्यात आली असून एकूण 122 आरोपीविरूद्ध कारवाई करण्यात आली आसल्याचे शिरगावकर यांनी सांगितले आहे.