Breaking News

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले चोरून !

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले चोरून !


पारनेर प्रतिनिधी-
     तालुक्यातील जवळा येथे दोघांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगून मोटरसायकलवरून एक जण जात असताना त्याच्याकडून पन्नास हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे वय 66 वर्षे धंदा शेती राहणार जवळा तालुका पारनेर हल्ली राहणार म्हसे खुर्द तालुका पारनेर हा मेडिकल मधून गोळ्या घेऊन भाऊ कुंडलिक रामजी शिंगाडे यांचे घरी पुनर्वसन वस्ती जवळा तालुका पारनेर येथे जात असताना पुनर्वसन वस्ती रोड वर त्याच्या समोर एक काळे रंगाची गाडीवरून दोघेजण आले त्यांनी स्वतः पोलीस आहे असे सांगून शिंगाडे याची अंगझडती घेऊन त्याला त्याच्या सर्व वस्तू परत देऊन पोलीस अधिकारी असल्याचे भासवून  फसवणूक करून सोन्याची 13 ग्रॅम  ची चैन 35000 रुपये किमतीची व 15000 रुपये किमतीची 5 ग्रॅम ची अंगठी घेऊन गेले याबाबत दशरथ शिंगोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना गुजर करत आहेत.