Breaking News

पारनेर बाजार समितीत आज झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये बाजारभाव !

पारनेर बाजार समितीत आज झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये बाजारभाव
----------------
कांद्याचे बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान.
-----------------
तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समिती आणून विकावा- सभापती प्रशांत गायकवाड


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर बाजार समिती मध्ये आज दि.20 रोजी  13330 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली झालेल्या लिलावा मध्ये कांद्याला 51 रुपये उच्चांकी बाजार भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिले आहे.


कांद्याला गेल्या काही दिवसापासून बाजार भाव मिळत नव्हता मात्र गेल्या दोन तीन आठवड्यांमध्ये बाजार भाव वाढण्यास सुरुवात झाली होती तर केंद्राने तातडीने निर्यात बंदीचा आदेश जाहीर केल्याने पुन्हा भावा मध्ये घट झाली त्यानंतर आज झालेल्या लिलावामध्ये बाजार समितीत या हंगामात 51रुपये हा उच्चांकी भाव ठरला यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे भाववाढ होण्या मागे सध्या कांदा आठवण शेतकऱ्याकडे शिल्लक नाही तसेच आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमधील कांदा पावसामुळे अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे व दक्षिणेकडील राज्यांची कांद्याला मागणी वाढली आहे ्यामुळे ही भाववाढ झाली आहे यापुढेही भाव वाढण्याची शक्‍यता असून शेतकऱ्यांनी आपला कांदा हा शेतावर बाजार समितीत आणून विकावा असे आवाहन सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.


पारनेर तालुक्यांमध्ये नवीन गुलब्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे व अनियमित हवामानामुळे ह्या कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे गेल्यावर्षी पारनेर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी लाखो रुपयाचे उत्पन्न कांद्यातून मिळवले होते कांद्याने गेल्या वर्षी शंभरी पार केली होती याहीवर्षी पन्नास रुपये बाजारभाव सध्या मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे मात्र अनिमित हवामानामुळे तालुक्यातील लागवड केलेला कांदा कितपत शेतकऱ्यांच्या हातात येईल यावरच शेतकर्‍यांचे आर्थिक गणित अवलंबून असणार आहे.

 प्रथम प्रतीच्या 4400 ते 5100 दुतीय 3400 ते 4300 तिसऱ्या प्रतीच्या कांद्याला 2200 ते 3300 व चौथ्या प्रतीच्या कांद्याला 700 ते 900 रुपये असा बाजार भाव आज पारनेर बाजार समितीत मिळाला आहे.
केंद्र सरकारने निर्यात बंद केली आहे त्या विरोधात सर्व सर्वच राजकीय पक्षांनी आवाज उठवला आहे मात्र केंद्राने निर्यात खुली केली नाही तर दुसरीकडे देशांतर्गत होत असलेला कांद्याचा तुटवडा यामुळे भाववाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.