Breaking News

जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात 9 हजार 973 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

 Relief for Marathwada as Jayakwadi gates opened - The Hindu

पैठण । जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात धडकत असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने रविवारी रात्री उशिरा जायकवाडी धरणाचे 16 दरवाजे अर्धा फुटवर उचलुन 9 हजार 973 क्युसेक यावेगाने गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. दरम्यान गोदापात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गोदावरी नदी तुंडब भरून वाहु लागली आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असुन, नागरिकांनी गोदावरी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी केले आहे. सध्या जायकवाडी धरणात 13 हजार 699 क्युसेक या वेगाने पाणी धरणात दाखल होत आहे.