Breaking News

प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ग्रामपंचायतीला फटकारले !

प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ग्रामपंचायतीला फटकारले !
---------
सार्वजनिक गटारीचे पाणी नदीत जाणार नाही याबाबत त्वरित उपाययोजना करण्याबाबत केल्या सूचना !
---------
दैनिक लोकमंथन याबाबत केले होते वृत्त प्रसारित ग्रामस्थांनी मानले आभारपारनेर प्रतिनिधी - 
        पारनेर तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने सार्वजनीक गटारीचे पाणी येथील सिद्धेश्वर नदीमध्ये सोडण्याचा प्रकार केला होता. याविरोधात ग्रामस्थांनी प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना निवेदन दिले तसेच दैनिक लोकमंथन ने हे वृत्त प्रसारित केले होते याची दखल घेत त्वरित प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण यांनी ग्रामपंचायतीला याबाबत फटकारले असून ग्रामपंचायतीची सांडपाणी जवळील नदी नाल्यात जाऊ नये व त्वरित उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीला पाठवले आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गटार योजनेचे सांडपाणी गावाच्या जवळून वाहणाऱ्या सिद्धेश्वर नदित सोडण्यात आले आहे. यामुळे या नदीवर असणाऱ्या पाचही बंधाऱ्यांचे पाणी प्रदुषित होत आहे. जवळ्यातील मेन पेठ येथील गटार योजनेचे पाणी प्राथमीक शाळेजवळील बंधाऱ्यात दोन वर्षापुर्वी सोडण्यात आले होते. त्यामुळे हा बंधारा पुर्णपणे दुषित झाला आहे. या बंधाऱ्यालगत मोठी दलित वस्ती आहे. त्याचा प्रचंड त्रास येथील लोकांना होत आहे.त्यांनी विरोध करूनही येथे सांडपाणी सोडण्यात आले .   
 ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गटार योजनेचे सांडपाणी गावाच्या जवळून वाहणाऱ्या सिद्धेश्वर नदित सोडण्यात आले आहे. यामुळे या नदीवर असणाऱ्या पाचही बंधाऱ्यांचे पाणी प्रदुषित होत आहे. जवळ्यातील मेन पेठ येथील गटार योजनेचे पाणी प्राथमीक शाळेजवळील बंधाऱ्यात दोन वर्षापुर्वी सोडण्यात आले होते. त्यामुळे हा बंधारा पुर्णपणे दुषित झाला आहे. या बंधाऱ्यालगत मोठी दलित वस्ती आहे. त्याचा प्रचंड त्रास येथील लोकांना होत आहे.त्यांनी विरोध करूनही येथे सांडपाणी सोडण्यात आले होते.   
याबाबत ग्रामस्थांनी विरोध दर्शवत आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता त्यावर प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण यांनी ग्रामपंचायतीला पटकावले असून यात म्हटले आहे की आपणास निर्देशित करण्यात येते की ग्रामस्थांनी केलेल्या कारवाईबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्या गावातील सांडपाणी हे नजिकच्या नदी व नाल्यात  जाणार नाही याबाबत उपाययोजना हाती घ्यावेत तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास व तक्रारदार यांना पाठवावा असेही या पत्रकात म्हटले आहे त्यामुळे तक्रारदार ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून दैनिक लोकमंथन चे वृत्त प्रसारित केल्या मुळे दखल घेतली आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.