Breaking News

भाजप नेत्या उमा भारती कोरोना पॉझिटीव्ह


 


देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यात सतत जनसंपर्कात असणाऱ्या मंत्री व नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता भाजप नेत्या उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीटकरून माहिती दिली आहे.

उमा भारती आपल्या ट्वीटमध्ये सांगतायत, मी आजचं माझ्या एका पहाड यात्रेच्या शेवटच्या दिवशी कोरोना टीम ला बोलावून टेस्ट करून घेतली. कारण गेल्या तीन दिवसांपासून मला ताप येत होता. त्यामुळे टेस्ट केल्यानंतर मी पॉझिटीव्ह आढळून आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या नागरिकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.