Breaking News

भंडारदरा येथे पर्यटकांच्या स्कार्पिओ गाडीला अपघात!

भंडारदरा येथे  पर्यटकांच्या  स्कार्पिओ गाडीला  अपघात!


भंडारदरा / प्रतिनिधी 
        राजूर कडून भंडारदऱ्याकडे येत असताना (गाडी न MH 13 DM 1900) या  पर्यटकांच्या गाडीला आज सायंकाळी मोठा  अपघात झाला असुन सदर वाहन  सोलापूर येथील असल्याची माहीती समोर आली आहे.   भंडारदरा  स्पिलवे जवळ हा  अपघात झाला।समोरच्या बाजुने  रॉंग साईटने येणाऱ्या गाडीला वाचवत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने  सदर स्कार्पिओ गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर जखमींना  पुढील उपचारासाठी राजूर येते हलविणात आले आहे. बाकीचे  पर्यटक बाल - बाल बचावले असुन सुखरूप आहेत. या अपघाची माहिती समजताच भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे व गावातील तरुणांनी घटना स्थळी धाव घेत मदत केली. राजूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रवीण थोरात यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत  पर्यटकांना धिर दिला व  गाडी काढण्यासाठी मोठी मदत केली. मात्र भंडारदरा पर्यटन बंद असताना  हे पर्यटक येतात कुठून? 
वारंवार प्रशासनाला कळवून देखील लक्ष का दिले जात नाही? भंडारादरा परीसरात वनविभाग व परीसरातील ग्रामपंचायतींनी मोठे कष्ठ घेऊन कोरोना या महाभयंकर साथीला आत्तापर्यंत तरी रोखुन धरले आहे. आणि या ठिकाणी कोरोना आजाराची लागण  झाली तर याला जबादार कोण? प्रशासनच दुर्लक्ष करत असेल तर सरपंचानी व कोरोना कमेटीनी कोणा कोणाशी  वैर घ्यायचे ? तर या  नंतर या ठिकाणी केव्हिडचं रुग्ण आढळल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनास धरण्यात . तर हे प्रशासकीय अधिकारी कोणाच्या तरी  दबावाखाली काम करतात कि काय असे वाटत आहे असे सरपंच पांडुरंग खाडे यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना  सांगितले.
-------–-