Breaking News

राजूर गाव ठरत आहे कोरोना हॉटस्पॉट !

राजूर गाव ठरत आहे कोरोना हॉटस्पॉट !


 राजूर प्रतिनिधी : 
    राजुर येथील ग्रामीण रुग्णालयात  १९ व्यक्तींच्या टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी १२ जणांच्या टेस्ट पॉजीटीव्ह आल्या आहेत. राजुर येथील एका खाजगी डॉक्टरांसह १२ जण कोरोना बाधीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजूर मध्ये रुग्ण संख्या 100 च्या पुढे गेली असून राजूर मध्ये काही प्रतिष्ठित व्यापारी तसेच काही किराणा दुकानदार व भाजी विक्रेते असे प्रत्येक ठिकाणी कोरोना रुग्ण निघत आहे.
           साधारण काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्ण गावात फिरकला हे समजताच राजूर ग्रामपंचायत ने पूर्ण गावात फवारणी करून राजूर गाव 15 दिवस बंद ठेवले होते. परंतु आता मात्र कोरोना पेशंटच्या घरातीलच माणसे गावात खुले आम फिरताना दिसत आहे. तरी त्या लोकांवर कोणीही कारवाई करत नाही. म्हणूनच या लोकांमुळे गावात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. त्यामुळे राजूर करांनो आपली काळजी आपणच घ्यावी. कामा साठीच बाहेर पडा मास्क वापरा सेनेटायझर चा वापर करा गर्दी टाळा.