Breaking News

नगरपालिका प्रशासन व एन एच ६१ महामार्गाच्या ठेकेदाराच्या गोंधळात पाण्यावाचुन नागरिकांचे हाल

नगरपालिका प्रशासन व एन एच ६१ महामार्गाच्या ठेकेदाराच्या गोंधळात पाण्यावाचुन नागरिकांचे हाल 


पाथर्डी प्रतिनिधी :
पाथर्डी शहरातुन जाणाऱ्या
एन एच ६१ या रोडचे काम बऱ्याच दिवसांपासुन रखडलेल्या कामाला सुरवात झाली असुन त्याच अनुषंगाने त्या रोडचे काम करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील नगरपालिकेची पाईपलाइन दोन दिवसांपासुन फुटली आहे.
           या पाईपलाईन द्वारे  माणिकदौडी येथील टाकीत पाणीसाठवण करत काही भागात पाणीपुरवठा केला जातो.परंतु दोन दिवसांपासुन पाईपलाईन फुटल्याने पाणी साठवण करता न  आल्याने पाणीपुरवठा विभाकडून पाणी सोडण्यात आले नसल्याने काही भागात ४ ते ५ दिवस पाणीच आले नसुन नागरिकांना पाण्याच्या तुटवडा निर्माण झाला आहे.नागरिकांमधुन यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.