Breaking News

कृषीकन्या मेघना बोंबले हिचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन !

कृषीकन्या मेघना बोंबले हिचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन !


 संगमनेर प्रतिनिधी : 
    शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील कृषीकन्या बोंबले मेघना रामनाथ ग्रामीण (कृषी) जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत नांदूर खंदरमाळ गावात कार्यानुभव कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांशी शेती विषयक गरजांवर संवाद साधून मार्गदर्शन केले. बदलत्या युगानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती कशी साधावी. तसेच मोबाईल फोन द्वारे घरबसल्या शेतीविषयक विविध माहिती व तंत्रज्ञान योग्य पद्धतीने कसे वापरावे या विषयावर चर्चा घडवून आणली. 
       तसेच बियाण्याचे प्रकार, लेबल, वर्ग व माती परीक्षण कसे करावे व माती परीक्षण करताना घ्यावयाची काळजी इ. विषयांवर चर्चा घडवून आणली. या प्रसंगी नांदूर खंदरमाळ गावातील सरपंच सुनंदाताई भागवत उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी बोंबले मेघना रामनाथ हिला डॉं. एस. बी. खरबडे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शेतकर्यांनी या कृषीकन्येचे खूप कौतुक केले.