Breaking News

भंडारदरा परिसरात कोरोनाचा शिरकाव !

भंडारदरा परिसरात कोरोनाचा  शिरकाव !


भंडारादरा / प्रतिनिधी
    अकोले तालुक्यात कोरानाने आपला विळखा घट्ट केल्याचे दिसुन येत असुन आज शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या अॅंटीजन टेस्ट मध्ये ९ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या असल्याची माहिती शेंडी येथील प्राथमिक आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली.
     अकोले तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढतच असुन आता आदिवासी भागातही कोरोना हळुहळु आपले बस्तान बसु पाहत  आहे. आज शेंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आलेल्या अॅंटीजन टेस्ट मध्ये कातळापुर येथील सात व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आल्या तर गुहीरा व वारंघुशी येथील प्रत्येकी एक व्यक्ती बाधित आल्या आहेत. शेंडी परीसरातील नागरीकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. सॅनिटायझरचा वापर करावा. तोंडाला सक्तीने मास्क वापरावा असे आवाहन शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडुन करण्यात आले आहे.

--------