Breaking News

मुञपिंडाच्या आजाराने बिबट्याचा मृत्यू !

मुञपिंडाच्या आजाराने बिबट्याचा मृत्यू


देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
               देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिर लगत असणाऱ्या खुरुद वस्ती जवळसोयाबिन पिकाच्या  शेतात सहा वर्ष वयाची मादी (बिबट्या) मृत अवस्थेत आढळून आली. शवविच्छेदन अहवालात मुञपिंडाच्या आजाराने त्या मादी जातीच्या बिबट्याचा  मृत्यू झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
                 याबाबत सविस्तर माहिती आशी की, देवळाली प्रवरा  शेटेवाडी रस्ता  खँडोबा मंदिरा जवळील बाळासाहेब जगन्नाथ  खुरुद यांच्या सोयाबिन पिकाच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळला. याबाबतची  माहिती वनक्षेञपाल यांना देण्यात आली. गेल्या तीन दिवसापुर्वीच या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक माहितीवरुन  समजते. घटनास्थळी वनक्षेञपाल यु.डी.  पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल परदेशी, एल.जी.किनकर, आदींनी पाहणी करुन प्राथमिक माहिती घेतली. 
                   या बिबट्याचे  जागेवरच शवविच्छेदन टाकळीमिया येथील पशु वैद्यकिय  डाँ.वैभव वाकडे यांनी केले. मृत बिबट्याचे अंदाजे वय 6 वर्ष असावे. मुञपिंडाच्या आजाराने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद केले आहे.बिबट्या आढळल्याची वार्ता पसरताच   बिबट्याला पाहण्यासाठी देवळाली  प्रवरा येथील नागरीकांनी गर्दी केली.
         बिबट्याची वाढती संख्या पाहता शेतकरी राञी शेतात पाणी भरण्यास धजवत नाही. या भागात अनेक दिवसापासुन बिबट्याचा वावर होता.  अनेक नागरीकांना या बिबट्याने दर्शन दिले होते. वनअधिकारी यांना विवेक मुसमाडे,अदिनाथ राजळे , गोविंदराव टिक्कल, दिलीप भोंडवे, सुधाकर भोसले आदींनी मदत केली.