Breaking News

पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार डाऊच खुर्द गावात शिरले पाणी !

पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार डाऊच खुर्द गावात शिरले पाणी, पंधरा कुटुंबांनी रात्र काढली जागून !
---------------
 आठ दिवस पुरेल इतके राशन प्रशासनाने पुरवावे --सरपंच गुरसळ


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
 कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात झालेल्या ढगफुटीच्या पावसाने वाहून आलेल्या ओढ्याच्या पाण्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली. आव्हाडवस्ती वरील १५ कुटुंबानी रात्र जागून काढली. पाटबंधारे विभागाने जर वेळीच ह्या ओढ्याचे खोलिकरण व रुंदीकरण केले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती. अतिवृष्टीच्या पावसाने बाधित झालेल्या कुटुंबांना प्रशासनाने ताबडतोब आठ दिवस पुरेल इतके राशन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सरपंच संजय गुरसळ यांनी करत पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा  जगधने यांना पाट बंधारे विभागाने तात्काळ या ओढ्याच्या बाजूला वाढलेले काटेरी झाडे व नळ्या टाकून देण्याचे निवेदन दिले.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, पंचायत समितीचे सदस्य अर्जुन काळे, शंकर गुरसळ, बाळासाहेब गुरसळ, पंकज पुंगळ, दिगंबर पवार आदी उपस्थित होते.
११ सप्टेंबरला ही या पाण्यामुळे अनेकजणांना फटका बसला होता. पाटबंधारे विभागाला ग्रामपंचायत डाऊच खुर्दच्या वतीने हे काम करण्यासाठी निवेदनही दिले होते मात्र त्याची अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतलेली दिसत नाही. संपूर्ण डाऊच खुर्द परिसरात शेतीची प्रचंड प्रमाणात नुकसान झाली. रखमाबाई किसान गुरसळ यांच्या घरावर रात्री वीज पडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचे कुटुंब शेजारीच असलेल्या
घरी आश्रयाला गेल्यामुळे बचावले.मोहम्मद शेख यांची कांद्याची चाळ पाण्यामुळे भिजली गेली, मोहन पवार यांची वस्तीचे मोठे नुकसान झाले.लक्ष्मण गुरसळ व दादासाहेब गुरसळ यांच्या शेतीची समृद्धी महामार्गाचे भराव ढासळल्याने मोठी नुकसान झाली.
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी देखील या परिसरामध्ये
येऊन पाहणी केली. पंचनामा करण्याचे आश्वासन दिले