पारनेर तालुक्यांमध्ये महिलांचे मोठे संघटन उभे करणार - उषा जाधव ------- भाजप महिला तालुकाअध्यक्षा उषा जाधव यांनी वाढदिवस प्रसंगी शासकीय ...
पारनेर तालुक्यांमध्ये महिलांचे मोठे संघटन उभे करणार - उषा जाधव
-------
भाजप महिला तालुकाअध्यक्षा उषा जाधव यांनी वाढदिवस प्रसंगी शासकीय कार्यालयामध्ये केले मास्क व सेफ्टी गॉगल चे वाटप.
-----------
वाढदिवस प्रसंगी अनाठायी खर्चाला फाटा देत जपली सामाजिक बांधिलकी.
----------
पारनेर प्रतिनिधी-
पारनेर तालुक्यातील भाजप च्या महिला तालुका अध्यक्ष उषा संतोष जाधव यांनी आपल्या वाढदिवसा प्रसंगी सामाजिक भावना जपत विविध शासकीय कार्यालयामध्ये नाईंटी फाईव्ह गॉगल सेफ्टी गॉगल चे वाटप केले आहे
वाढदिवस प्रसंगी अनाठायी खर्चाला फाटा देत जपली सामाजिक बांधिलकी सध्या कोरोनाशी मुकाबला करत काम करणाऱ्या शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना कोरोना पासून संरक्षण मिळावे म्हणून मास्क व सॅनिटायझर वाटप करत आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आगामी काळामध्ये तालुक्यांमध्ये महिलांचे मोठे संघटन उभे करून भाजप कार्यकारिणीला बळकटी देण्याचे काम करणार असून महिलांसाठी तालुक्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत तालुक्यातील महिलांना संघटित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम केले जाणार आहे असे उषा जाधव यांनी वाढदिवस प्रसंगी सांगितले.
भाजपा पारनेर तालुका महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. उषा संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज पारनेर तालुक्यांमध्ये हे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी कोरोनामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला सेफ्टी गॉगल व मार्च वाटप करण्यात आले तहसिल कार्यालय पोलीस कृषी तसेच पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी सौ. उषा संतोष जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पारनेर तालुका अध्यक्ष वसंत चेडे व जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अश्विनी ताई थोरात तसेच पारनेर तालुका भाजप उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे सचिन ठुबे सतीश म्हस्के दिलीप पारधे संतोष जाधव दत्तात्रय थोरात अनिता ढसाळ तालुक्यातील भाजपचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते.