Breaking News

प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल - माजी सभापती दीपक पवार

प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल - माजी सभापती दीपक पवार
----------
माझ कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा अस्तगाव येथे शुभारंभ.


पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे ग्रामपंचायत व पदाधिकार्‍यांच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानास सुरुवात करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार ग्राम विकास अधिकारी सारिका वाळुंज आरोग्य सेवक सेविका सरपंच आदी उपस्थित होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी माजी सभापती दीपक पवार यांनी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी कोरोनावर मात करायची असेल तर लक्षणे दिसतात त्वरित तपासणीसाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली तर कोरोनावर वर यशस्वी मात केली जाईल यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काटेकोरपणे काळजी व जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे दीपक पवार यांनी सांगितले.
राज्यभर ही मोहीम राबवली जात असून तालुक्यात या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अस्तगाव यांच्यावतीने करण्यात आला यावेळी गावातील 50 कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली दररोज 50 कुटुंबांची आरोग्य तपासणी या मोहिमेमध्ये होणार आहे त्यामुळे संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ही मोहीम राबवली आहे त्या उद्देशाने ग्राम पातळीवर देखील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे अस्तगाव मध्ये गेल्या काही दिवसापासून रुग्णांची संख्या वाढली होती अनेक रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे सध्या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आटोक्यात आले आहेत गावातील ग्राम विकास अधिकारी सरपंच आरोग्य सेवक सेविका व कर्मचारी यासाठी नियमित प्रयत्नशील आहेत मोहिमेत कोरोनादूत घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक तपासणी करुन त्यांची माहिती संकलित करणार आहेत .