Breaking News

माजी आमदार नंदकुमार झावरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन - डॉ. रंगनाथ आहेर

माजी आमदार नंदकुमार झावरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन -  डॉ. रंगनाथ आहेर 

 
पारनेर प्रतिनिधी- 
     अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार आदरणीय नंदकुमार झावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयाच्या वतीने पारनेर येथील ए.डी.सी.सी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना व मा.नंदकुमार झावरे पाटील पतसंस्था येथील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत वाफेचे मशीन (स्ट्रीमर )भेट देण्यात आले. सध्या कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी आपण सर्वांनी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. बँक कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी पारनेर महाविद्यालयाने बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि बँकेत येणाऱ्या सर्व ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मशीनचे वाटप करण्यात आले.
                   तसेच पारनेर येथील सर्व कोव्हिड १९ सेंटरमध्ये आज  स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले.आपण पाहतो समाजामध्ये आज कोव्हिड १९ च्या वातावरणामुळे सर्वत्र अस्वस्थ वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधिलकी मानून, मानवी मूल्यांना केंद्रवर्ती ठेवून पारनेर महाविद्यालयाने हा उपक्रम राबवला आहे. पारनेर महाविद्यालय नेहमी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असते.
                   या उपक्रमाबद्दल तालुक्याच्या सर्व स्तरांतून महाविद्यालयाचे कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, कार्यालयीन अधीक्षक सुनिल चव्हाण,श्री. नामदेव ठाणगे, डॉ सुधिर वाघ,  प्रा. अशोक मोरे, डॉ. भिमराज काकडे, प्रा. गंगाराम खोडदे, प्रा. संजय कोल्हे,  डॉ. संभाजी काळे, सावकार काकडे, रोहीणी दिघे, बाबू शिंदे, सुभाष बर्डे, बाळासाहेब इघे व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते.