Breaking News

कोपरगाव नगरपालिकेचे कर्मचारी साबळे यांचे कोरोनाने निधन.

कोपरगाव नगरपालिकेचे कर्मचारी साबळे यांचे कोरोनाने निधन.


करंजी प्रतिनिधी-
    कोपरगाव नगरपलीकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी राजेंद्र प्रभाकर साबळे यांचे सोमवार दि ७-९-२०२० रोजी पहाटे निधन झाले त्या मुळे आज रोजी कोपरगाव शहरातील जनता खऱ्या अर्थाने कोरोना योध्याला कोरोना आजाराने गमावून बसली आहे.

   साबळे यांच्या निधनाने नगरपालिके सोबत कोपरगाव शहरात देखील हळहळ व्यक्त होत असून आ आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वाहडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल तसेच  सर्व आजी माजी नगरसेवकांनी व नगरपालिका प्रशासनाने दुःख व्यक्त केले.
   साबळे यांच्या मागे पत्नी दोन मुले पाच मुली नातवंडे असा परिवार आहे.कोपरगाव कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल केले होते  तेथेच त्याची कोरोनाशी झुंज अपुरी पडली व त्यातच मृत्यू झाला असून त्यांचा वर आज उशिरा नगर येथेच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुनील आरणे यांनी दिली आहे.