Breaking News

साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी कोरोनाने निधन !

साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी कोरोनाने निधन !


शिर्डी/प्रतिनिधी :
             साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे कळते. यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक प्रकृती खालवल्याने त्यांच्या वर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती.

             गेल्या सोळा वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते.  तसेच मोहन यादव हे नेहमी कोणाच्याही मदतीस धावून जाणारे होते. त्यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून दिल्या आहेत.यादव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.

        मिळालेल्या  स्थानिक माहिती नुसार, यादव यांनी लिहिलेल्या श्री साईचरित्र दर्शन या पुस्तकाचा बारा भाषेत अनुवाद झाला. त्यांनी लाखो लोकांना दर्शनासाठीही मदत केली .