Breaking News

कोपरगाव तालुक्यात ३४ रुग्णाची भर तर ३९ कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात ३४ रुग्णाची भर तर ३९ कोरोनामुक्त
---------------
कोरोना रुग्णाची संख्या १५०० पार


करंजी प्रतिनिधी-
 आज दिनांक २० सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १५६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २४ बाधित तर १३२ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर नगर येथील अहवालात ६ खाजगी लॅब च्या अहवालात ४ कोरोना बाधित आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

शहरात १५ तर ग्रामिण १९ रुग्ण आढळून आले आहे

सुभद्रा नगर-२
अन्नपूर्णा नगर-१
निवारा-२
कर्मवीर नगर-१
रिद्धी सिद्धी नगर-१
टाकळी नाका-४
धारणगाव रोड-१
साई धाम-१
कापड बाजार-१
तेरा बंगले-१
बहादरपूर-१
उक्कडगाव-३
वारी-२
साखर वाडी-५
संजीवनी-२
मढी-१
कान्हेगाव-१
येसगाव-१
कोकमठाण-१
जवळके-१
कोळपेवाडी-१

असे आज १९ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

 आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ३९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १५२० तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७२ झाली आहे.

आज  आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या २६ झाली आहे.