Breaking News

माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेची करंजी येथे सुरुवात !

माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेची करंजी येथे सुरुवात


करंजी प्रतिनिधी-
राज्य भरातील कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून खबरदारी चा उपाय म्हणून प्रत्येकाने आपापल्या कुटूंबाची काळजी घेणे गरजेचे असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेची हाक देत राज्य भारत आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वे करत राबविण्याचे जाहीर केले आहे.
 कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येने बाराशे चा टप्पा पार करत २३ रुग्णांनी प्राण देखील गमावला आहे तालुक्यातील करंजी गावात देखील आज पर्यंत पाच कोरोना रुग्ण आढळून आले होते त्याच अनुषंगाने करंजी  करंजी आरोग्य विभागातर्फे जिल्हा परिषद सदस्या विमलताई आगवन यांच्या शुभहस्ते नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करत माझं कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

    या प्रसंगी रयत शिक्षण संस्था सातारा चे कौन्सिल सदस्य कारभारी आगवन, सरपंच छबुराव आहेर, उपसरपंच रविंद्र आगवन, तालुका शेतकरी संघाचे संचालक अरुण भिंगारे, सांडूभाई पठाण, अनिल डोखे, डॉ गव्हाणे, ग्रामसेवक गुंड भाऊसाहेब, आरोग्य विभागाच्या हर्षाली परदेशी तसेच आरोग्य सेविका व अशा सेविका उपस्थित होत्या.