Breaking News

आ. पवार यांचा राज्यपाल यांना खोचक टोला

 


अहमदनगर : कांदा उत्पादक शेतकर्‍याने व्यथा मांडण्यासाठी राज्यपालांना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्टिव करून खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी विरेश आंधळकर यांनी राज्यपालांना पत्र पाठविले आहे. कांदा निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव गडगडणार आहे.

त्यामुळे व्यथा मांडण्यासाठी आपणास भेटायचे आहे. शेतकर्‍याच्या या मुलासाठी वेळ द्यावा. या पत्राचा संदर्भ घेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्टिव करत राज्यापाल आणि विरोधी पक्षनेते यांना खोचक टोला लगावला आहे.

"या शेतकर्‍याला निश्‍चित वेळ देतील. ते कलाकार आणि विरोधी पक्षनेते यांचे म्हणणे ऐकूण घेतात. त्यावर सरकारला योग्य निर्देश देतात. आपण अन्नदाता असल्याने त्या आपल्या व्यथा जाणून घेतील".