Breaking News

अतिवृष्टी बाधितांना जोगेश्वरीचा निवारा !

अतिवृष्टी बाधितांना जोगेश्वरीचा निवारा !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 परतीच्या  पावसाने कोपरगाव तालुक्यात धुमाकुळ घातला असुन चांदेकसारे, डाउच खुर्द व जेऊर कुंभारी भागात अतिवृष्टी होत आहे, मंगळवारी सायंकाळी  जोरदार पर्जन्यवृष्टी झाली,त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान तर झालेच त्याच बरोबर नागरिकाचे अतोनात हाल झाले,डाउच खुर्द येथील वैभवनगर परिसरातील नाल्याला पुरआल्यामुळे शेजारी राहत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तू भिजल्या व रात्री झोपायला जागा उरली नाही हि बाब जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष  भास्करराव होन व सचिव  सुनिल होन यांना समजताच सामाजिक बांधीलकी जपत त्यांनी नागरिकांसाठी जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल च्या खोल्या खुल्या करून दिल्या. त्यामुळे नागरिकांना निवा-याची सोय होत तातपुरताका होईना मोठा   आसरा मिळाला आहे. 
शिक्षणातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी ही जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल जपत माणुसकी या नाथ्याने एक प्रेरणादायी नविन आदर्श निर्माण करत असल्याचे स्कूल चे मॅनेजिंग डायरेक्टर सागर भास्करराव होन यांनी या वेळी सांगितले.