Breaking News

चैतन्य ताम्हाणेच्या 'या' मराठी चित्रपटाला 'इंटरनॅशनल क्रिटिक्स' पुरस्कार

 marathi film director Chaitanya Tamhanes The Disciple Wins Big At The  Venice Film Festival maharashtra | व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या  'चैतन्य'ची छाप | Loksatta

मुंबई : दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याच्या एका चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि तो चित्रपट म्हणजे 'द डिसायपल'. चैतन्यच्या 'द डिसायपल' या चित्रपटाला ७७ व्या आंतरराष्ट्रीय व्हेनिस चित्रपट महोत्सवात FIPRESCI च्या 'इंटरनॅशनल क्रिटिक्स' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित असून शास्त्रीय गायक आदित्य मोडक यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.


व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव आहे. १९३२ पासून हा चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. या महोत्सवात १९३७ मध्ये चित्रपट 'संत तुकाराम' हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.