Breaking News

कोपरगाव नगरपरिषदेने पाणीपटटी व घरपटटी माफ करून दिलासा दयावा !

कोपरगाव नगरपरिषदेने पाणीपटटी व घरपटटी माफ करून दिलासा दयावा !
---------
भाजपाचे शहराध्यक्ष कैलास खैरे यांची मागणी

कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     कोपरगाव नगरपालिकेने शहरातील नागरीकांना घरपटटी व पाणीपटटी माफ करून दिलासा दयावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी मुख्याधिकारी आणि तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यापुर्वी .तहसिलदार, कोपरगाव व  मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद यांना निवेदन देउन माहे एप्रिल, मे आणि जून २०२० महिन्याची पाणीपटटी व घरपटटी माफ करण्याची मागणी केली होती, सुमारे चार महिन्यापुर्वी मागणी करूनही नगरपालिकेकडून 
अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोपरगाव शहरातही रूग्णांची संख्या वाढत आहे. 
      त्यामुळे आजही कोपरगाव शहरातील बाजारपेठ, दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाही, रोजगार उदयोगधंदे ठप्पा झाल्याने सर्व नागरीक, व्यापारी,गोरगरीब, छोटे व्यावसायिक, मध्यमवर्गीय तसेच हातावर पोट भरणा-या नागरीकांना जीवन जगणे अवघड झाले आले, या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करतांना जीवन मरणाच्या अवस्थेतून नागरीक जात आहे, याही परिस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेच्या करनिर्धारण विभागाकडून नागरीकांना कराचे बील वाटपाचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळेे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागरीक आर्थीकदृष्ट्या मेटाकुटीस आलेले असल्याने पाणीपटटी व घरपटटी माफ करावी, अशी मागणी यापुर्वी केली होती, तसेच पुढील जुलै,आॕगस्ट महिन्यातही कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यावसायांवर परिणाम झाल्याने आर्थीक आवक मंदावली, त्यामुळे माहे एप्रिल ते आॕगस्ट २०२० अखेर नगरपरिपदेची घरपटटी व पाणीपटटी पुर्णपणे माफ करून नागरीकांना दिलासा दयावा,अशी मागणीही श्री खैरे यांनी केली आहे.