Breaking News

सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना सहा लाखाचे कर्ज वाटप !

सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना सहा लाखाचे कर्ज वाटप !


  कोपरगाव प्रतिनिधी -
 प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटांना नुकतेच सहा लाख रुपयांचे कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेचे गौतमनगर शाखेचे शाखाधिकारी सुनील गाडे यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.
                   बचत गटाच्या महिलांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे नेहमीच प्रयत्नशील असतात. बचत गटाच्या महिलांना कर्जपुरवठा करून या महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु असतो. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वच आर्थिक क्षेत्राच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत.
     मात्र अशा परिस्थितीत सौ. पुष्पाताई काळे यांनी  बचत गटाच्या महिलांना सहा लाखाचे कर्ज वितरण करून आर्थिक संकटात मदतीचा हाथ दिला  आहे. गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सभागृह येथे कोपरगाव तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना धनादेश  वितरण करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी सुनील गाडे  म्हणाले की, घेतेलेले कर्ज सत्कारणी लावून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा.घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून बँकेकडे आपल्या बचत गटाची पत वाढवा असा मौलिक सल्ला उपस्थित बचत गटाच्या महिलांना त्यांनी दिला. यावेळी  श्री.दत्त सागर, साई अमृत, वैष्णवी मॉ, कृष्णा, सप्तशृंगी व ओम साई आदि बचतगटांना धनादेश देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक जयपाल जाधव, अनिल पवार आदींसह बचत गटाच्या महिला सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होत्या.  
                   
--