Breaking News

पितरांची मेजवानी महागात पडली, पितर जेवले आणि करोना घेऊन गेले!

 पितरांची मेजवानी महागात पडली, पितर जेवले आणि करोना घेऊन गेले!


अकोले/ प्रतिनिधी :
    सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने  हा पंधरवडा कोरोना पंधरवडा म्हणून पुढे येऊ लागला आहे.   गणेश विसर्जना नंतर पितृ पंधरवडा सुरू झाला आहे  पूर्वजांचे श्राद्ध घालत कावळ्यांना घास दिल्याने व पितरांना  मिष्टान्न भोजन दिल्याने  पूर्वजांचे पुण्य लाभते असा  पूर्वापार रिवाज असल्याने या पंधरवड्यात पितरांच्या जेवणावळी सुरू असतात या काळात गावोगावी पितरांच्या भोजनावळी सुरू असल्याने  यातून कोरोनाचा  प्रसार होऊ लागल्याचे आता  पुढे आले आहे राजूर येथील ही घटना प्रातिनिधिक स्वरूपात असली तरी  गावोगावी जनतेने याची दखल गँभिर पणे घेणे आवश्यक  झाले आहे.
   अकोले तालुक्यातील राजूर येथील घटनेतून प्रशासनाला बोध घ्यावा लागत आहे  यामुळे पितृ पंधरवड्याचा विषय आता प्रशासनाने व जनततेने गांभिर्याने घेण्याची वेळ आली.
     पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांच्या जेवणाचा लाभ  घेणाऱ्या पैकी १८ जण कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोना टेस्ट तपासणी नंतर  रविवारी ही घटना उघडकीस आली. जेवणानंतर अनेकांना सर्दी,खोकला सुरू झाला. त्यामुळे धावपळ उडाली. प्रशासनाने
राजूर गाव पाच दिवस लॉकडाऊन केले आहे.या जेवणास उपस्थित असलेले अनेक जण आपण पॉझिटिव्ह तर नाहीत ना, या भीतीने तपासणी करून घेत आहेत. उपस्थितांपैकी काहींना राजूर येथील रुग्णालयात,तर काहीं नी संगमनेरला, तर काहींनी  अकोल्यात तपासणी केली  राजूर ग्रामीण रुग्णालय, गर्दणीत
खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये ४७ जणांची तपासणी
करण्यात आली. त्यातील  तब्बल ८ पॉझिटिव्ह आढळले. कोरोना
रोखण्याबाबत प्रशासन, राजूरचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक,
पोलिसांची तातडीची बैठक घेण्यात येऊन राजूर गाव पाच
दिवसांसाठी बंद करण्याबाबत निर्णय  स्थानिक प्रशासनाने घेतला आहे
----