Breaking News

आधी नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाचे सरकारला फटकारलं


 नागपूर : नागपुरात आधी 1000 खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारा   असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. गेल्या 19 ऑगस्टला महानगरपालिकेने कोव्हिड रुग्णालयाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. पण, अद्यापही त्यावर काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचं उल्लंघन झाल्यास राज्य सरकारच्या सचिवांना न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 1957 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत नागपूर जिल्ह्यात 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोनाची परिस्थिती इतकी भयावह असून राज्य सरकार मात्र कोव्हिड रुग्णालयाबाबत चालढकलपणा करताना दिसत आहे. विभागीय क्रीडा संकुलात हे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित आहे.