Breaking News

कोपरगाव तालुक्यात २९ रुग्णाची वाढ तर ४० कोरोनामुक्त !

कोपरगाव तालुक्यात २९  रुग्णाची वाढ तर ४० कोरोनामुक्त !
--------------
शहरात आज परत एकाचा मृत्यू !


करंजी प्रतिनिधी-
 आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २३  बाधित तर १७८ अहवाल निगेटीव्ह आले आहे तर  खाजगी लॅब च्या अहवालात ६ कोरोना बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर
लक्ष्मी नगर - २
गवारे नगर -१
विवेकानंद नगर - १
गांधी नगर - १
रचना पार्क - १
गुलमोहोर कॉलनी - १
छ. शिवाजी रोड - १
कोपरगाव - १
महादेव नगर - ४
धारणगाव रोड - १

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

माहेगाव देशमुख -२
वारी - ६
शिंगणापूर - १
मूर्शतपूर - १
संवत्सर  - २
साखरवाडी - १
कुंभारी - १
वेळापूर - १
कोळपेवाडी - १

असे आज ३० सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २९ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील ४० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १८३६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२९ झाली आहे.

 आज रोजी कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील ६० वर्षीय पुरुषाचा  मृत्यू झाला आहे त्यामुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३३  झाली आहे.