Breaking News

हंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान.

हंगे तलाव तुडुंब भरला पारनेर शहरातील नागरिकांसह परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान.
------------
सलग दुसऱ्या वर्षी वाहत आहे हंगा तलावाचा सांडवा


पारनेर प्रतिनिधी - 
     पानेर शहरासह हंगे परिसराला वरदान असलेला हंगे तलाव यावर्षी झालेल्या पावसामुळे तुडुंब भरला आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पारनेर शहरासह हंगे परिसर या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असतो या तलावार पारनेर शहरातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे तलावातुन शहराला पाणीपुरवठा केला जातो जर तलाव कोरडा राहिला तर शहराची पाणीपुरवठा योजना विस्कळीत होते आणि त्यामुळे शहराला अन्यत्र म्हणजे मुळा डॅम  व इतर पाण्याचे सोर्स शोधावे लागत असतात गेल्या वर्षीदेखील हंगे तलाव काठोकाठ भरला होता त्यामुळे शहराला पाणीटंचाई भासली नव्हती यावर्षी तलावात 30 टक्के पाणी साठा शिल्लक होता व सध्या झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला असून सांडव्या द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडत आहे यामुळे परिसरातील व शहरातील लोक या तलावातील पाणी पाहण्यासाठी तलाव परिसरामध्ये येत आहेत.


    गेल्या अनेक वर्ष पावसाचे प्रमाण कमी असल्याने तलाव भरत नव्हता दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे तलावा कोरडाठाक पडला होता तलावाला अनेक वर्ष झाले असल्याने या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता भारतीय जैन संघटनेने गाळ काढण्यासाठी मशनरी पुरवली व हा निघालेला गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नेऊन टाकला भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारातून या तलावांमध्ये असणारा गाळ काढण्याचे काम करण्यात आले वर्षानुवर्ष तलावामध्ये गाळ काढला गेला नव्हता त्यामुळे तलावाची पाण्याची क्षमता कमी झाली होती जैन संघटनेने तलावातील पूर्ण गाळ काढल्यानंतर 30 टक्के पाण्याची क्षमता वाढली व गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे पूर्ण तलाव काठोकाठ भरला  उन्हाळ्यामध्ये  जवळपास 30 हून अधिक पाणीसाठा शिल्लक राहीला पारनेर शहराला याच तलावातून वर्षभर पाणीपुरवठा करण्यात आला अतिरिक्त मुळा डॅम च्या पाण्याची या वर्षी गरज भासली नाही याहीवर्षी पारनेर शहरासाठी तलाव भरला आहे ही समाधानाची बाब आहे.
    या तलावावर हंगे परिसरातील शेती अवलंबून आहे अनेक हेक्टर क्षेत्र हे तलावाच्या पाण्यामुळे ओलिताखाली येत असते तलाव 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 पारनेर शहर व परिसराला वरदान ठरणारा हंगे तलाव आहे शहरातील पाणीपुरवठा योजना या द्वारे होत असते या तलावाच्या पाणीसाठ्या वर पारनेर करां चा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो हा तलाव तुडुंब भरल्यामुळे शहरातील नागरिक हे पाणी पाण्यासाठी तलाव परिसरामध्ये येत आहेत.