Breaking News

कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकरणी जाहीर !

कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकरणी जाहीर !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांच्या सूचनेप्रमाणे कोपरगाव शहर शिवसेनेची जूनी कार्यकरणी बरखास्त करून नवीन कार्यकरणी जाहीर करण्यात आली.
उपशहरप्रमुख पदी विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गोपाल वैरागळ, गगन हाडा,भूषण पाटणकर, आकाश कानडे तर शहर संघटक पदी बाळासाहेब साळूंके व नितीन राऊत सहसंघटक वैभव गिते विभाग प्रमुख पदी विजय शिंदे, दिपक बरदे, जयेश हसवाल, समीर शेख, रफिक शेख, मयुर दळवी, सौरव गायकवाड, शैलेश वाघ, किरण गायकवाड या प्रमाणे नियुक्ती करण्यात आली.
   यावेळी  नूतन कार्यकारीनीला मार्गदर्शन  करताना  जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बदनामी होईल असे वागू नका, शिवसेनेशी,पक्षप्रमुखांशी व आपल्या पदाशी प्रामाणिक राहा व पदावर राहून दुसऱ्या पक्षाचं काम करू नका, पदाचा मान राखा. पक्षाचं ध्येय, धोरण व विचार प्रत्येक घरात पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न करा.
शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल म्हणाले की, नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे.फक्त सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना पद द्यायचे नव्हते,खरे काम करणाऱ्यांना पदे दिलेली आहेत.शिवसेना समाज कारण करण्यासाठी आहे.पहिले काय होत ते विसरा व आता ही शिवसेना नवीन जोमाने काम करणार असून जो कोणी पक्षाच्या ध्येय- धोरणा विरोधात काम करेल त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
भरत मोरे म्हणाले की, निर्मळ स्वच्छ मनाने काम करा,भविष्यात तुम्हाला जनतेत जाऊन अनेक मोठे पदे मिळतील, कोणाच्याही पाकिटावर न जगता आपला स्वाभिमान जिवंत ठेवून काम करा, खरे धर्मवीर म्हणजे राजाभाऊ,ज्या समाज कंटकांनी गो माता विकण्याचे काम केले त्यांना देवाने धडा शिकवला आहे.
अस्लम शेख म्हणाले की,पक्षात संयमाने काम केले तर आपणाला नक्कीच योग्य ठिकाणी विचार केला जातो. दीड वर्षानंतर कोपरगाव शहराची मरगळ झटकल्या गेल्याने शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य संचारले आहे.वीस वर्षे मी फक्त शिवसैनिक होतो.जो काम करत राहील त्याला नक्कीच पदे मिळतील.जर कार्यकर्त्यांनी चुकीच्या काम केले तर खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना शिवसेना स्टाईल ने चालेल.
शिवसेनेच्या नूतन पद नियुक्ती मुळे सर्व शिवसैनिकांना मध्ये उत्साह वाढला आहे व कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण वातावरण जय भवानी जय शिवराय च्या घोषणांनी दुमदुमून गेले 
 यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, एसटी कामगार सेनाप्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, युवासेना सहसचिव सुनील तिवारी, रविंद्र सोमासे,युवानेते विक्रांत झावरे,योगेश मोरे,गोविंदा शिंदे,दशरथ सालकर विशाल झावरे,निशांत झावरे,इरफान शेख,मुन्ना मन्सूरी,वाल्मिक चिने,अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे, अजय शिंगाडे,सनी डहांके,भूषण वडांगळे, रितेश राऊत,रोहित बरदे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.सपना मोरे,राखी विसपुते,अश्विनी होने, नगरसेविका सौ. वर्षाताई शिंगाडे  आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन भरत मोरे तर आभार सपना मोरे यांनी मानले