Breaking News

राज्यात काल एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित!

 431 New Corona cases in Maharashtra total rise 5649 says Health Department  of state scj 81 | महाराष्ट्रात ४३१ नवे करोना रुग्ण, १८ जणांचा मृत्यू,  संख्या ५ हजार ६०० च्याही वर | Loksatta

मुंबई : राज्यात काल गणेशोत्सव साधेपणाने पार पडला. कोरोनाचे सावट सर्वच सणांवर कायम असून काल राज्यातील रुग्णसंख्येत १५ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून देशामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण काही प्रमाणात दिलासादायक असले तरी नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होणे देखील आवश्यक आहे.

काल, १५ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. राज्यात एकूण १ लाख ९८ हजार ५२३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १० हजार ९७८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.३२ % झाल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 

दरम्यान, काल दिवसभरात ३२० रुग्णांचा मृत्यू झाला. सद्या, १३ लाख ७९ हजार ५१९ नागरिक हे होम क्वारंटाईन असून ३६ हजार २० नागरिक हे संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.