Breaking News

कांदा बंदी विरोधात पाथर्डी तालुका राष्ट्रवादीचे तहसीलदार निवेदन !

कांदा बंदी विरोधात पाथर्डी तालुका राष्ट्रवादीचे तहसीलदार निवेदन


पाथर्डी/प्रतिनिधी :
कांदा निर्यात बंदी धोरणाच्या विरोधात पाथर्डी तहसील येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत निषेध नोंदवत नायब तहसीलदार गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.आणि ही बंदी त्वरित उठवण्याची मागणी करण्यात आली.

  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे,संदीप राजळे,चंद्रकांत मरकड,आनंद पवार,देवा पवार,शुभम वाघमारे,प्रतिक धरणकर,अक्रम आतार,हारून मणियार,रमेश शेळके आदी जण उपस्थित होते.