Breaking News

वडनेरला रक्तदान शिबिर संपन्न !

वडनेरला रक्तदान शिबिर संपन्न !


 निघोज प्रतिनिधी -
  सध्या सर्वत्र कोरोना रोगाचा प्रार्दू भाव वाढत चालला असुन रक्त।ची कमतरता भासत असते त्यामुळे वडनेर 
 बु . स्पोर्ट्स क्लब"या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वडनेर याठिकाणी 'भव्य रक्तदान शिबीर'आयोजित करण्यात आले.कोरोना महामारिच्या सद्यपरिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना राष्ट्र कार्याच भान ठेऊन' वडनेर बु  स्पोर्ट्स क्लब 'व पुना सिरोलाँजिकल इन्सिट्युट ब्लड बँक,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले .या शिबिरात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. या शिबिरात सौ.शुभांगीताई सुनिल चौधरी या  महिलेन रक्तदान केल त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमास 'आमदार निलेशजी लंके  प्रतिष्ठान चे युवक तालुका अध्यक्ष मा.विजुभाऊ औटी व त्यांचे सहकारी, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मा.अनिलजी शेटे, पं.स.सदस्य मा.दिनेश दादा बाबर,वडनेर बु!!स्पोर्ट्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष मा.सोमनाथ वायदंडे, विशेष सल्लागार मा.राम वायदंडे,उपाध्यक्ष मा.विठ्ठल बाबर, सरपंच रेखाताई येवले , ग्रा.पं.सदस्य सुनिल बाबर,राहुल बाबर, मा.अनिल नर्हे सर रमेश येवले ,रामदास वायदंडे ,प्रुथ्वीराज खुपटे , शिवा पवार, गणेश शेटे आदी ग्रामस्थ आणि स्पोर्ट्स क्लब चे सर्व पदाधिकारी,खेळाडू व रक्तदाते मित्र परिवार  उपस्थित होते .
    या शिबिरामध्ये सर्वांनी  मास्क व सॅनेटायझरचा वापर करून
 नियम पाळून  शिबीर शिस्तबद्ध रित्या संपन्न झाले.सर्व सभासद,समस्त ग्रामस्थांचे स्पोर्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.