Breaking News

बाळांतपणाच्या कळा बरोबर तिने सोसल्या, आरोग्य यंत्रणेच्या गलथान पणाच्या कळा !

बाळांतपणाच्या कळा बरोबर तिने सोसल्या, आरोग्य यंत्रणेच्या गलथान पणाच्या कळा

भंडारदरा/ प्रतिनिधी
          अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराजवळील वारंघुशी गावामध्ये आरोग्य खात्याच्या गलथान कारभाराचा फटका एका गरीब आदिवासी महिलेला बसला आरोग्य कर्मचाऱ्यांचे  बे फिकीरी मुळे  आदिवासी महिलेला ताटकळत थांबावे लागले  शेवटी गावातील एका अनुभवी महिले कडून तिचे बाळंतपण करण्यात आले 
  बाळ व आई दोन्ही सुखरूप असले तरी त्या  आदिवासी महिलेला  आरोग्य विभागाच्या त्रासाच्या कळा सहन कराव्यालागल्या 
 वारंघुशी  गावात गुरुवारी आरोग्य उपकेंद्रात ही घटना घडली जबाबदार आरोग्य  महिला कर्मचाऱ्यांचे  जोपर्यंत  निलंबन होत नाही तोपर्यंत गावातील आरोग्य उपकेंद्र सुरु होऊ देणार नाही अशी भुमिका गावच्या नागरिकांनी घेतली आहे.
         सविस्तर वृत्त असे की वारंघुशी येथील मंजाबाई निरंकार लोटे या महिलेचे गुरुवारी बारा वाजता पोट दुखु लागल्याने गावातीलच आरोग्य उपकेंद्रात गेली. त्यावेळी या दवाखाण्यामध्ये आरोग्य कर्मचारी उपलब्ध असुन देखील बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत मंजाबाई च्या वेदना प्रचंड वाढत चालल्या होत्या. गावात दोनवेळा दवंडी देऊनही या आरोग्य कर्मचारी उपस्थित झाल्या नाहीत. शेवटी गावातीलच महिलांच्या प्रसुतीचा अनुभव असणा-या महिलेला बोलावुन  या महिलेची प्रसुती करावी लागली.
        घटनेची माहिती गावच्या सरपंच अनिता संजय कडाळी व माजी. उपसभापती भरत घाणे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी दवाखाण्यातच बाथरुममध्ये लपुन बसल्याचे निदर्शनास आले. आरोग्य कर्मचारी महिलेचे हे वर्तन एका प्रसुती महिलेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे गावक-याचे म्हणणे आहे. जोपर्यंत या आरोग्य महिला कर्मचारीचे निलंबन होणार नाही तोपर्यंत या गावातील उपकेंद्राचे टाळे आम्ही उघडणार नसल्याचे सांगत गावक-यांनी उपकेंद्रास कुलुप लावले आहे. तर वारंघुशी हे गाव परीसरातील मोठे गाव असुन आमचे गाव शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जोडण्याची मागणी गावच्या सरपंचांनी केली आहे. या अगोदरही दोन वर्षे अगोदर याच आरोग्य उपकेंद्रासमोर एका कातकरी महिलेची आरोग्य कर्मचारी अभावी पोटावर पाय देऊन प्रसुती केली गेली होती. त्यामुळे या गावातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य उपकेंद्रास कुलूप लावण्यासाठी गावच्या सरपंच अनिता संजय कडाळी,पंचायत समिती सदस्या अलकाताई अवसरकर, मा उपसभापती भरत घाणे, सुनिता गोरख डगळे, भिमाबाई लोटे व भिमा लोटे यांच्या सह अनेक गावकरी उपस्थित होते.
--