Breaking News

पाथर्डीच्या विजेचे तीन तेरा;तीन महिन्यापासुन वीजपुरवठा सुरळीत होईना !पाथर्डीच्या विजेचे तीन तेरा;तीन महिन्यापासुन वीजपुरवठा सुरळीत होईना !


पाथर्डी प्रतिनिधी :
शहरातील वीजपुरवठा गेल्या तीन महिन्यापासुन वारंवार खंडित होत असल्याने याचा मनस्ताप प्रामाणिकपणे वीज बिल भरण्याऱ्या ग्राहकांना होत असुन याबाबत अनेक राजकीय,सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदने देऊनही अत्यावश्यक सेवेत मोडणारे वीज वितरण कार्यालय मात्र हा प्रश्न निकाली काढण्यास अपयशी  ठरल्याने व योग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

            गेल्या तीन महिन्यापूर्वी तालुक्यात पडलेल्या धडकेबाज पावसानंतर दीड दिवस वीजपुरवठा १३२ के.व्ही.सबस्टेशनमध्ये तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आला होता.त्यानंतर परत काही दिवसांनी काही भागातील विद्यूत वाहक तारा तुटल्याने पुन्हा एक दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता.
   
    यानंतर अनेक राजकीय मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील खंडित होत असलेल्या वीज पुरवठाबाबत महावितरण कार्यालयास निवेदने देत हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
परंतु त्यानंतर काही दिवस  व्यवस्थित वीज पुरवठा झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासुन पुन्हा विजेचे तीन तेरा वाजले आहेत.काल मध्यरात्री उपनगरातील वीज वाहक वायर  तुटल्याने पुन्हा वीज पुरवठा सकाळी १० वाजेपर्यंत खंडित झाला होता.त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला परंतु पुन्हा दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला आहे...

          महावितरण कार्यालयाचे अधिकाऱ्यांना संपर्क साधला की,काम चालू आहे या पलीकडे दुसरे वाक्य ऐकायला मिळत नाही.जेवढी तत्परता ते वीज बिल थकीत ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्यात दाखवतात तेवढी तत्परता ते वीज प्रश्न सोडवण्यात दाखवत नाहीत.तसेच महावितरणाचे काही वायरमन नागरिकाचे फोन घेत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.तसेच कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे.

एकंदरीत पाथर्डी वीजपुरवठा कार्यालयाची कामाची पद्धत पाहता त्याच्यावर कुठल्याही वरीष्ठ अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याने ते मनमानी करत असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत असुन यामध्ये वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष्य घालणे गरजेचे आहे.