Breaking News

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ येथील रुई चोंडा येथे वाहून गेलेल्या पोलिसाचा शोध सुरु !

वाहून गेलेल्या पोलिसाचा पुन्हा शोध सुरु तहसीलदार तहसीलदार ज्योती देवरे

नगर येथून शोध घेण्यासाठी आपत्कालीन वाहन मागवण्यात आले आहे
-----------
पोलिसांची तीन पथके घेत आहेत रात्रभर शोध


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील रुई चोंडा धबधबा येथे अहमदनगर रेल्वे चे चार पोलीस काल दुपारी या परिसरामध्ये आले होते येथे फोटो काढत असताना जी ए दहिफळे पोलीस  धबधब्यांमध्ये पडून वाहून गेला  त्यानंतर प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला मात्र अद्याप शोध लागला नाही आज सकाळी ही शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
शोधकार्य सुर्योदयानंतर सुरु करण्यात आले आहे परंतु अत्यंत खोल डोह असल्याने मृतदेह अद्याप शोधता आला नाही. धबधब्याखाली खुप मोठ्या आकाराचे रांजणखळगे तयार झाले आहे.पोहणार्या व्यक्तींनी कडेकपारीने शोध घेतला आहे. पोलीस कपारीखाली उभे राहुन समोरचा मित्र फोटो काढत होता परंतु तेथे पाण्याचा मोठा भोवरा असल्याने ते खेचले गेले आहेत.मृतदेह त्यामुळे डोहातच आहे हे स्पष्ट झाले आहे.नगर येथुन आपत्कालीन वाहन मागविण्यात आले आहे.दोरखंड टाकुन डोहात शोध घेण्याचे काम सुरु करत आहोत.आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डाॅ बडदे व अग्निशमन अधिकारी मिसाळ यांचे मार्गदरशनाप्रमाणे पुढील कार्यवाही करत आहोत.कोणीही रुईचोंडा धबधब्याकडे येऊ नये असे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.
दरम्यान रात्रीही ही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ तसेच रेल्वे पोलिस चे उपनिरीक्षक कांबळे रेल्वे पोलीस ठाणे अहमदनगर आणि ग्रामस्थ असे एकूण 19 जण  ठिकाणी 3 पथकात शोध मोहीम राबवित आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.