Breaking News

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन वकृत्व स्पर्धा !

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने ऑनलाइन वकृत्व स्पर्धा !


अहमदनगर/प्रतिनिधी :
       आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत जामखेड मधील सर्व वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात तरी सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आव्हान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून केले जात आहे. ओंकार गुंड, स्वप्निल तनपुरे, गणेश सुद्रिक यांनी या स्पर्धेचे आयोजन यांनी केलेले आहे. मी अनुभवलेले रोहितदादा पवार, पवार साहेबांचे सामजिक योगदान, ऑनलाइन शिक्षण प्रणाली ..योग्य की अयोग्य ?, तरुणांनी राजकारणात का यावे ? या विषयावर आपला पाच मिनिटांचा व्हिडिओ ७७७४९२०४०१ या व्हाट्स अँप नंबर वर पाठवावा जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आव्हान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कर्जतच्या वतीने करण्यात आले आहे.