Breaking News

पारनेर येथील हॉटेल सावलीच्या पाठीमागे देशी विदेशी दारू बाळगल्या ने एका विरोधात गुन्हा दाखल.

पारनेर येथील हॉटेल सावलीच्या पाठीमागे देशी विदेशी दारू बाळगल्या ने एका विरोधात गुन्हा दाखल.
--------------
विना मास्क फिरणाऱ्या सात व्यक्तीवर गुन्हे दाखल


पारनेर प्रतिनिधी- 
     पारनेर येथील हॉटेल सावली च्या पाठीमागे एक व्यक्ती देशी-विदेशी दारू विनापरवाना चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आला त्याच्यावर पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल सावली च्या येथे आरोपी सुभाष भास्कर सोबले वय 40 रा. सोबलेवाडी ता. पारनेर हा हॉटेल सावली च्या मागील बाजूस वैरणीचे आडोशाला सोबलेवाडी पारनेर येथे 6148 रु कि च्या  विदेशी कंपनीच्या दारूचे बाटल्या विनापरवाना बेकायदा चोरून विक्री करण्याचे उद्देशाने बाळताना मिळून आला याविरोधात पो. कॉ.राम फक्कड मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. उजगरे हे करत आहेत.
दरम्यान कोरोना च्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सात व्यक्तीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे गुन्हे दाखल केले आहेत यात पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यावर  भारतीय दंड संहिता कलम 188 269 270 साथ रोग प्रतिबंध अधिनियम 1897 कलम 2, 3, 4 प्रमाणे 07 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.