Breaking News

सेंद्रीय शेती काळाची गरज, कृषीदूत प्रविण डोके -तरडगव्हाण येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

 सेंद्रीय शेती काळाची गरज, कृषीदूत प्रविण डोके -तरडगव्हाण येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम  संपन्न 


मांडवगण/प्रतिनिधी- 
रासायनिक शेतीतून पिकणा-य अन्नधान्याच्या सेवनाने मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहे तसेच  मानवाला असंख्य  असह्य समस्यांनातोंड द्यावे लागत आहे. मानवाचे  आयुर्मान  कमी होत आहे. म्हणून  सेंद्रीय शेती  शिवाय  पर्याय नाही.  ती  काळाची गरज आहे असे प्रतिपादन कृषीदूत प्रविण डोके यांनी तरडगव्हाण तालुका श्रीगोंदा  येथे  आयोजित  कृषी जागृतता कार्यानुभव कार्यक्रमात केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  लोकनियुक्त सरपंच नवनाथराव डोके पाटील  होते. 
            महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलुज यांच्या संयुक्त विद्यमाने व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील व विद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी कोरटकर सर व प्राचार्य आर जी नलवडे सर व कार्यक्रम अधिकारी प्रा एस एम एकतपुरे, कार्यक्रम सहाय्यक अधिकारी एस आर आडत व डीएस मिटकरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जागृतता कार्यानुभव कार्यक्रम यांच्या अंतर्गत सेंद्रिय शेती मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामपंचायत तरडगव्हाण येथे आयोजित करण्यात आला. यावेळी कृषिदूत प्रवीण नवनाथ डोके यांनी सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन केले  व ते कसे बनवायचे व त्याचे  फायदे याची कृती याबाबत  सविस्तर  माहिती  सांगितली.  या कार्यक्रमास गावचे सरपंच नवनाथ डोके ,उपसरपंच रोहिदास बेरड  ,राजेंद्र आप्पा वाळके, केरन सेंद्रिय मार्गदर्शक महेश सुरवसे( लिपिक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) ,दीपक डोंगरे, संजय डुंगरवाल ग्रामपंचायत  सदस्य गोवर्धन डोके गौतम  ढोरजकर गणेश बेरड भाऊसाहेब पठारे  चंद्रकांत वाळके नेमीचंद राजगुडे शेतकरी  व ग्रामस्थ  मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.