Breaking News

पारनेर तालुक्यात आज २३ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज २३ अहवाल पॉझिटिव्ह !


पारनेर प्रतिनिधी - 
   पारनेर तालुक्यात आज प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार २३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तालुक्यामध्ये काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे गेल्या काही दिवसांपासून २५ ते ३५ यादरम्यान तालुक्यात दररोज रुग्णसंख्या आढळून येत आहे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ही पंधराशे पार झाली आहे.
आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये ढवळपुरी १ वाळवणे १ वडझिरे १ पारनेर १ नांदूर पठार २ वडनेर बुद्रुक १ पळवे बुद्रुक २  पळवे खुर्द १ कान्हूर पठार ६ पुणेवाडी १ वेसदरे १ चिंचोली १ कुरुंद १ सुपा ३ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव अहवालामध्ये समवेत आहे.
तालुक्यात विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या तसेच प्रशासनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांविरोधात दररोज पारनेर पोलीस स्टेशन च्या वतीने तसेच सुपा पोलिस स्टेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात येत आहे तरीही अनेक नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.