Breaking News

पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात !

पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात !

तुझा मोबाईल नंबर दे,तू मला खूप आवडतेस असे म्हणत केला मुलीचा विनयभंग!


पारनेर प्रतिनिधी- 
   पारनेर तालुक्यातील जाधववाडी,वडझिरे ता. पारनेर येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुलीने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यानुसार एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 31 रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास फिर्यादी मुलगी वय 14 वर्ष 6 महिने,ही किराणा स्टोअर्स भैरवनाथ मंदिरा जवळ जाधववाडी, वडझिरे,मध्ये किराणा सामान घेण्यास गेली असता. आरोपी दिलीप नारायण जाधव,राहणार जाधव वाडी, तालुका पारनेर, जि अ.नगर.(अटक) याने मुलीस भैरवनाथ मंदिरा जवळ जाधववाडी येथे बोलावून मुलीस म्हणाला की, तुझा मोबाईल नंबर दे, तू मला खूप आवडतेस, त्यावेळी मुलगी आरोपी ला म्हणाली की, तू मला असे का म्हणाला, म्हणून मी माझे आईला जाऊन सांगते असे म्हणून मुलगी त्या ठिकाणावरुन निघून गेली  व त्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला, तेव्हा मुलीची आई आरोपीस विचारण्यासाठी गेली असता विचारपूस करून आरोपीस म्हणाली की तुझ्यावर पोलीस केस करते तेव्हा आरोपी म्हणाला की एक वेळेस काय दहा वेळेस पोलीस केस कर असे म्हणून निघून गेला याबाबतची फिर्याद अल्पवयीन मुलीने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली असून त्यानुसार भा. द. वी. क. 354 (ड),506 सह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा 1989 चे कलम  3 (1)(w)(i), बालकांचे लैंगिक व प्रधान पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11 (4),12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.