Breaking News

राहुरी शहरात तालुक्यात अखेर आठ दिवस लोकडाऊन चा निर्णय !

राहुरी शहरात तालुक्यात अखेर आठ दिवस लोकडाऊन चा निर्णय ! 


राहुरी शहर प्रतिनिधी :
    राहुरी शहरासह तालुक्यात कोरणा बाधित रुग्णांची संख्या 650 वर पोहोचल्याने व मृत्यूचा आकडा 22 वर पोहोचल्याने लॉक डाऊन ची गरज निर्माण झाली होती. 
     शहरातील व्यापारी नागरिक व ग्रामीण भागातूनही याबाबत चर्चा वाढली होती . आज व्यापारी संघटना , लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व प्रशासन आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत तब्बल अडीच तास बाबत चर्चा झाली .  चर्चेमध्ये बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम ,रावसाहेब चाचा तनपुरे , माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे , देवेंद्र लांबे, विजय डौले ,डॉ  जयंत कुलकर्णी , वैभव धुमाळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख , राजेंद्र दरक आदींनी सहभाग घेतला . येत्या गुरुवारी दिनांक 10 ते गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत राहुरी शहरासह तालुक्यात संपूर्ण लोकडाऊन चा निर्णय घेण्यात आला . आजअखेर राहुरी तालुक्यात 658 कोरोना बाधित रुग्ण झाले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे . 
    आठ दिवसांच्या लोक डाऊन मुळे फरक पडणार असून जनतेने , ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून मास्क वापरणे , सॅनिटायझरचा वापर करणे ,  अंतर राखणे व विनाकारण बाहेर जाणे टाळावे , असे आवाहन सभापती अरुण तनपुरे , तहसीलदार एस आर शेख , पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख , देवळाली प्रवरा चे नगराध्यक्ष सत्यजित कदम आदींनी केले आहे .