Breaking News

पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा : सरपंच पंकज कारखिले !

पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा : सरपंच पंकज कारखिले !
-----------
शेतकर्‍यांच्या मदतीकडे सरकारचे दुर्लक्ष


पारनेर/प्रतिनिधी :
    सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने हातातोंडाशी  आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून  नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकजदादा कारखिले पाटील यांनी महसुल आणि कृषि विभागाच्या अधिकार्‍यांकडे केल्या आहेत.
      दरम्यान, पावसाच्या नैसर्गिक संकटांबरोबरच कोविड-19 मुळेही शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतू शेतकर्‍यांच्या मदतीच्या मागणीकडे महाविकास आघाडी सरकारचे पुर्णत: दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप पंकजदादा कारखिले पाटील यांनी केला आहे. शेतक-यांच्या मदतीसाठी तातडीने निर्णय करण्याची मागणी त्यांनी केली.
      मागील दोन दिवसात तालुक्यात मोठ्या स्वरुपात वादळी वा-यासह पाऊस झाला. या पावसाने सुमारे ७०० हेक्टर वरील शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, ऊस, बाजरी हे हाती आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतक-यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले आहे. यापुर्वीही पिकांच्या नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. पंचनाम्याचे अहवाल पाठवुनही शासनाकडुन अद्यापही कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. आता पुन्हा एकदा नैसर्गिक संकट शेतक-यांवर ओढावले असल्याचे सरपंच पंकजदादा कारखिले म्हणाले.
   नुकत्याच झालेल्या पावसापुर्वी सुध्दा झालेल्या संततधार पावसामुळे अनेक गावातील जमीनींना पाझर फुटल्याने पेरणी झालेली पीक सडुन गेली आहेत. अनेक सखल भागात पाणी साठलेले असल्याने ऊस, मका आणि घास या पिकांवरही विपरीत परिणाम होवून पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहाणी करुन या शेतक-यांनाही मदतीची आवश्यकता असल्याकडे सरपंच पंकजदादा कारखिले यांनी लक्ष वेधले आहे.
    झालेल्या पिकांच्या नुकसानीचे गांभिर्य  कृषि अधिकार्यांच्या निदर्शनास आपण आणून दिले असून, शेतक-यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली असल्याचे नमुद करुन सरपंच पंकजदादा कारखिले म्हणाले की, स्थानिक पातळीवर कृषि आणि महसुल विभागाने एकत्रितपणे पंचनामे करुन या नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवावा अशा आशयाची मागणी आपण आधिका-यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.