Breaking News

नगर तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना मिळाला आ.लंके यांचा आधार !

नगर तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना मिळाला आ.लंके यांचा आधार !
-----------------
बचत गटाच्या महिलांची अनेक दिवसापासून बँकेत प्रकरणे होती प्रलंबित.
-----------------
आ. लंके यांनी महिलांच्या कर्ज प्रकरणाबाबत विलंब का झाला म्हणून अधिकाऱ्यांना विचारला जाब


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर नगर मतदारसंघातील बचत गटांच्या महिलांचे कर्जप्रकरणे सेंट्रल बँक देहरे शाखेमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित होते याविषयी महिलांनी वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र बँक अधिकारी कर्मचारी दाद देत नव्हते हा प्रश्न आमदार निलेश लंके यांच्या निदर्शनास  आणून दिल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी त्वरित त्याची दखल थेट बँकेत जात बँक अधिकाऱ्यांची विचारणा केली त्यावर बँक अधिकाऱ्यांनी त्वरित हा प्रश्न मार्गी लावणे बाबत आमदार लंके यांना आश्वासन दिले.
नगर पारनेर मतदार संघातील  शिंगवे नाईक, नांदगाव,देहरे, विळद येथील बचत गटाच्या महिलांचे कर्ज प्रकरणे सेंट्रल बँक मध्ये कर्मचारी कमी आसल्याचे कारण सांगत महिलांचे दोन महिन्यापासून बचत गटाचे प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले होते.वारंवार विनंती करूनही बँकेचे अधिकारी व कर्मचारी सदर बचत गटातील महिलांना उडवाउडवीची उत्तरे देत होते . अनेक बचत गट त्यामुळे अडचणीत आले असून अनेक निराधार महिला बँकेच्या या आडमुठ्या कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या होत्या .  


          आमदार निलेश लंके यांचे नगर तालुक्यातील समर्थक श्री. हरिदास जाधव यांनी या महिलांना मदत करण्यासाठी बँकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली होती परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे या बचत गटाच्या महिलांची अडचण आमदार लंके यांना सांगितली.या भागातील गोरगरीब महिलांची आर्थिक सक्षमता मिळावी म्हणून या बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे.व या बचत गटातील गरीब महिला आपल्या कमाईतील पुंजी या बचत गटाच्या माध्यमातून जमा करत असताना या महिलांना या बचत गटाचा मोठा आधार वाटतो .
    बचत गटाचा प्रश्न असल्यामुळे आमदार निलेश लंके यांनी तात्काळ  देहरे येथील सेंट्रल बँक शाखेमध्ये त्या महिलांना बोलावून घेतले व आमदार लंके स्वतः तिथे आले व या महिलांचा प्रश्न त्वरित मार्गी लावला आठ दिवसाच्या आत सर्व प्रकरणे मंजूर केले जातील असे शाखा मॅनेजरने आमदार निलेश लंके यांना सांगितले,मात्र आठ दिवसात प्रकरणे मंजूर न झाल्यास पुढील मंगळवारी सेंट्रल बँक शाखेमध्ये उपोषणास बसणार असे आमदार लंके यांनी सांगितले व या बचत गटातील महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पूर्णपणे मदत करणार असे आश्वासित केले .      
        निलेश लंके यांनी बचत गटाच्या महिलांचा प्रश्न त्वरित सोडवल्यामुळे चारही गावातील महिलांनी त्यांचे आभार मानले .
      याप्रसंगी सी.आर.पी. च्या अध्यक्ष सुनंदा चव्हाण,अंजना गुळवे,अनिता जाधव,संगीता बोरुडे, ज्योती साळवे,रूपाली केदारे,सविता पुंड, संगीता गुळवे, प्रियांका जावळे, मोहिनी राजपूत, शमीम शेख,जयश्री धोत्रे, स्वाती वाळके, शिंदे ताई, बिरजा सी शेख, हरिदास जाधव, हरीश शेळके, किशोर भुजबळ, सचिन गवारे,नवाब शेख तसेच बचत गटाचे गव्हाणे,सागर माळी इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते .

      शिंगवे नाईक येथील एक वयस्कर आजी अंजना गुळवे यांच्या नातीचे लग्न असल्यामुळे त्यांना पैशाची अत्यंत गरज होती.आमदार  निलेश लंके यांनी त्या वृद्ध महिलेचे पहिले प्रकरण मार्गी लावायचे आदेश शाखा मॅनेजर यांना दिले व त्यांना त्वरित पैसे उपलब्ध करून देण्यात यावे अशा सूचना केल्या. त्यामुळे अंजना गुळवे यांची महत्वाची अडचण दूर झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येते होते !