Breaking News

रायकर यांच्यावर उपचार करण्यास दिरंगाई करणाऱ्या रूग्णालयावर कारवाई करा,पत्रकार संघाची मागणी !

रायकर यांच्यावर उपचार करण्यास दिरंगाई करणाऱ्या रूग्णालयावर कारवाई करा,पत्रकार संघाची मागणी


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी
     TV9 या वृत्तवाहिनीचे पुणे येथील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना कोकमठाण येथील ‘एव्हर हेल्दी’ संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास दिरंगाई केल्याने त्यांचा आजार बळावला गेला. त्यांच्याकडे कॅशलेस मेडिकल पॉलिसि असतानाही स्वीकारली नाही. उलट चाळीस हजार रुपये अगोदर रोख भरा आणि मगच रुग्णाला दाखल करु अशा प्रकारची भूमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यास विलंब झाला. त्यांना श्वसनाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. रुग्णालयाने वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती जास्तच खालावली त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथेही त्यांच्या बाबातीत असाच प्रकार घडला. वेळेत उपचार न झाल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. 
         त्यामुळे कोकमठाण येथील ‘एव्हर हेल्दी’ संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल सदर रुग्णालयाची सखोल चौकशी करून त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दि ४ सप्टेंबर रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनावर, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण गव्हाने उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, सचिव संतोष जाधव,खजीनदार सिध्दार्थ मेहेरखांब,पत्रकार लक्ष्मण वावरे,  सोमनाथ सोनपसारे,साहेबराव दवंगे, लक्ष्‍मण जावळे, ,नानासाहेब शेळके,हेमचंद्र भवर, रफिक रंगरेज, राहुल देवरे, रोहित टेके ,संजय लाड, योगेश डोखे,शिवाजी जाधव, अनिल दिक्षित , निवृत्ती शिंदे,जनार्दन जगताप,विजय शेळके,गोरख वरपे ,काकासाहेब खर्डे, संजय भवर ,हाफीज शेख,,दत्तात्रय गायकवाड,अक्षय खरात,नितीन जाधव मोबीन खान,यांच्या स्वाक्षऱ्या आहे.