Breaking News

शाब्दिक बाचाबचीतून जीवे मारण्याचा प्रयत्न, एकाला जामीन

 


पुणे - शाब्दिक बाचाबाची झाल्याने तलवारीसारखे हत्यार आणि कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला न्यायालयाने 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. एस. आर. भांगडीया झवर यांनी हा आदेश दिला.

नीलेश कैलास वालगुडे (वय 29, रा. खामगांव मावळ, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. ही घटना 5 मे 2020 रोजी रात्री 11.30 वाजता वेल्हा तालुक्‍यातील कोंडगाव येथील खामगाव फाटा येथे घडली. याबाबत हॉटेल व्यावसायिक स्वप्नील रोहिदास दुधाणे (वय 31, रा. नऱ्हे) याने फिर्याद दिली. मनोज विलास दुधाणे (वय 31, रा. खामगाव मावळ, ता. हवेली) असे घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. राहुल ऊर्फ लक्ष्मण अशोक वालगुडे याच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

राहुल याने जखमी दुधाणे याला जेवायला बोलावून घेतले होते. त्यावेळी शाब्दिक वादातून हा प्रकार घडला. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असाताना नीलेश याने जामिनासाठी अर्ज केला होता. विविध अटींसह न्यायालयाने तो मंजूर केला.